स्तुत्य उपक्रम : वाचनालयाला दिली ५० ग्रंथ भेट..

धुळे -१८/५/२३

साक्री तालुक्यातील म्हसदी येथे गावातील तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.
या उद्देशाने येथील सार्वजनिक वाचनालयाला देवरे परिवाराच्या वतीने पन्नास ग्रंथ भेट देण्यात आले.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
येथील प्रगतशील शेतकरी लोटन डोंगर देवरे यांचे सुपुत्र व आर.डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी जितेंद्र देवरे यांनी .पंडितराव देवरे सार्वजनिक वाचनालयाला पाच हजार रुपये किंमतीचे पन्नास ग्रंथ वाचनालयाचे अध्‍यक्ष नरेंद्र देवरे व सचिव अंजना देवरे यांच्या कडे सुपुर्द केले.
गेल्या दोन वर्षापासून जितेंद्र देवरे तथा परिवाराने परिसरातील शाळा, महाविद्यालयांचं वाचन करायला ग्रंथ व पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबवित आहे.
त्यामुळे देवरे परिवाराचे गावातील ग्रामस्थांसह वाचकांनी कौतुक केले आहे.
यावेळी जितेंद्र देवरे,पिंटू मिस्तरी,ज्ञानेश्वर देवरे,रवींद्र निकम,समर्थ कासार, भटु देवरे व वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते .
यावेळी आभार वाचनालयाच्या ग्रंथपाल नयना देवरे यांनी मानले.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

ner dilip salunkhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here