नंदुरबार :२४/३/२३
सदर लग्न सोहळे म्हटलं की पारंपारिक लग्न सोय राहिले दूरच
आता त्यात आधुनिक विवाह पद्धतींचा स्वीकार करण्यास नववधू आणि वराकडून पसंती दिली जाते..
विशेषता रिंग सेरेमनी प्री-वेडिंग शूटिंग बेबी शॉवर या अत्याधुनिक पद्धती रूढ होण्यास सुरुवात झाली..
यावर अव्वा का सव्वा पैसा खर्च होतो..
केवळ एन्जॉयमेंट म्हणून याकडे पाहिलं जातं मात्र गुजरात राज्यातील कुकरमुंडा तालुक्यातील बाळदा येथील दोडे गुजर समाजाने एक क्रांतिकारी पाऊल उचललं..
ते म्हणजे या सर्व गोष्टींवर सर्वानुमते त्यांनी बंदी घातली..
खरोखर या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे..
विवाह सोहळ्यातील नव्या आणि जुन्या चालीरीती बंद करण्यासाठी नुकताच या समाजाची एक बैठक पार पडली…
सदर बैठकीत बाळदा गावात नियमावली बनवण्यात आली..
रिंग सेरेमनी प्री वेडिंग शूट बेबी शॉवर यासह वराची मिरवणूक या प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला..
या नियमांचे जो उल्लंघन करेल त्याला कुठल्याही प्रकारचा सहकार्य गावातून मिळणार नाही तसंच गावातील एकही गावकरी त्यांच्या लग्नकार्यात उभा राहणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
यावेळी नवीन उपवर मुला मुलींचे साखरपुडा झालेत त्यांनी निर्णय मान्य केल्याबद्दल त्यांचा समाजाचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
सदर संकल्पना कांतीलाल चौधरी यांनी मांडली…
कार्यक्रमास कन्हैया पटेल, शांताराम पटेल मोहन गोहिल, सुनील पटेल, राजेंद्र चौधरी उपस्थित होते.
प्रवीण चव्हाण, एम.डी.टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार