पतीविरोधात थेट पत्नीची नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार ..

0
426

१ जून पासून उपोषणाला बसण्याचा इशारा … आयुक्तांना दिले निवेदन

शिंदखेडा /नाशिक -३/५/२३

शिंदखेड्याचे तत्कालीन तहसीलदार सुनील सौंदाणे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेत..

त्यांच्या पत्नीने थेट आता नाशिक आयुक्तांना गाठले..

आपल्या पतीविरुद्ध त्यांनी तक्रार अर्ज आयुक्तांकडे दिला आहे..

एका निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी एक जून पासून उपोषणाला बसण्याचा इशारा नाशिक आयुक्तांच्या भेटीत दिला..

धुळे जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी शिरपूर यांनी तत्कालीन तहसीलदार यांच्या विरोधात केलेले तक्रारी अर्ज, गुन्हे आणि उपोषण यांची दखल न घेतल्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांना त्यांच्या पत्नी सौ वैशाली सौंदाणे यांनी तक्रारी वजा निवेदन सादर केले..
त्या निवेदनात प्रमुख मागण्या याच प्रमाणे-
*तत्कालीन तहसीलदारांनी 2003 पासून महसूल शासन सेवेत असताना अद्यापही मुलांची नावे सेवा पुस्तकाला लावलेले नाहीत

  • *मीना बोडकेंवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तरी त्यांची सेवा पुस्तकाला कुठेच नोंद नाही
  • *मीना अशोक बोडके आणि मिश्रा यांच्या मुलांना नाव दिले तरी शासनाने दखल घेतली नाही
  • *शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून मीना बोडकेला स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न केलेला आहे याची गांभीर्याने दखल घेतली नाही..
    *याबाबत विविध तक्रार अर्ज दाखल करून देखील शासनाकडून कोणतेही कार्यवाही केली नाही..
  • आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
  • https://bit.ly/3UoK7E0
    त्यांची निलंबन जिल्हाधिकारी धुळे यांचे अधिकार वापरल्यामुळे झालेले असून माझ्या तक्रारींचा त्यांचा संबंध नाही अशी माहिती याबाबत यातून दिली आहे..
    माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारीतून वैशाली सौंदाणे यांनी सांगितले..
  • या संदर्भातलं सविस्तर निवेदन त्यांनी नुकतच नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केलं..
    नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक जून 2023 पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी या निवेदनातून दिला आहे..
    यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही, न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here