प्रकाशा येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

0
570

गुजरात राज्यातील नवसारी येथील एका अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुला सोबत दिनांक ३० एप्रिल रोजी होणारा बालविवाह
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतील “ऑपरेशन अक्षता” ने थांबविला आहे. बालविवाह रोखण्याची हि महिनाभरात चौथी घटना आहे.

महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाय योजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनापासून सुरु करण्यात आला आहे. दि. २९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुजरात राज्यातील नवसारी येथील एका अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुलासोबत दिनांक ३० एप्रिल रोजी बालविवाह होणार आहे. दिनांक २९ एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मिळाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अक्षता समितीचे सदस्या नयना देवरे, सहा.पोलीस निरीक्षक, महिला सेल, नंदुरबार यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणे बाबत आदेशीत केले.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अक्षता समितीचे सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता प्रकाशा येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबियांकडे नवसारी येथील वधू मूली बाबत विचारपूस केली असता वधू मुलगी ही विवाहाच्या वेळी प्रकाशा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी त्यांना वधू मुलीच्या जन्म तारखे बाबत विचारपूस केली असता मुलीचे वय १६ वर्षे ८ महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे असलेल्या वधू मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत फोनद्वारे संपर्क करून त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई करण्यात येते याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच वधू मुलास व त्याच्या नातेवाईकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरेे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय बालविवाह समितीच्या सदस्या नयना देवरे, सहा.पोलीस निरीक्षक, महिला सेल नंदुरबार, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार नेमणूकीचे पोलीस नाईक विकास कापूरे, पुरुषोत्तम सोनार, शहादा पोलीस ठाणे नेमणूकीचे पोलीस हवालदार मेहरसिंग वळवी, पोलीस अंमलदार कृष्णा जाधव अशांनी केली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here