BRS PARTY:पाचोर्‍यात काँग्रेस मनसेला खिंडार..

0
1040

किशोर गरुड आणि प्रवीण पाटलांचा बी आर एस मध्ये प्रवेश

भडगाव : 3/7/23

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात आता बऱ्याच विविध पक्षातल्या नेत्यांचं इनकमिंग सुरू झालंय.. अब की बार किसान सरकार असा नारा देत बी आर एस ने दमदार महाराष्ट्रात एन्ट्री केलीय..
शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळवणाऱ्या सगळ्या पक्षांना पळता भुई करण्याचं काम सध्या बी आर एस पक्ष करत आहे.. पक्षाची पाळी मुळे रुजण्याच्या कामास महाराष्ट्रात जोरात सुरुवात झाली आहे.. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि पिंपळगाव ग्रामीण विकास मंडळाचे वाचनालयाचे सदस्य सेवानिवृत्त मॅनेजर किशोर गरुड यांच्यासह राजुरी चे माजी सरपंच आणि मनसे पक्षाचे पाचोरा तालुका सदस्य प्रवीण पाटील या दोघेही उभयतांनी भारत राष्ट्र समितीत अधिकृत जाहीर प्रवेश केलाय.. त्यामुळे काँग्रेस आणि मनसेला पाचोऱ्यात खिंडार पडली…

8e952395 ce3e 435a 8ddd 087062c0ee77
1
2
3

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

भडगाव येथील श्रीराम मंदिरात तालुका समन्वयक पत्रकार सतीश पाटील यांच्या हस्ते शाल आणि शिफळ देऊन या दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला.. यावेळी किशोर गरुड यांनी एमडीटीवीशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया नोंदवली.. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न म्हणजे हमीभाव वीज पाणी आर्थिक मदत केवळ के सी आर सरकारच देऊ शकेल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बी आर एस पार्टीत सामील व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात बी आर एस पक्षाचा वाढ विस्तार आणि संघटन आणि कार्यकर्ता बांधणी वेगाने होईल या दृष्टीने सारेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे पाहिला मिळतंय.. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्यातल्या स्थापित पक्षांसमोर हे कडवे आव्हान उभे ठाकणार आहे हे म्हणणे वावगे ठरू नये..
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here