CONGRESS PROTEST:शेतकऱ्यांना वीज द्या अन्यथा ऊर्जामंत्री महोदय खुर्ची खाली करा..

0
163

शिंदखेडा /धुळे -२०/६/२३

CONGRESS PROTEST:

राज्य सरकारचा कोणताही सरकारी विभाग असो तो पाचवीला पुजलेलाच..
त्यात शिक्षण विभागासोबत आता ऊर्जा खात अर्थात महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय
शिंदखेडा शहराच्या महावितरण कार्यालयावर शिंदखेडा शहर काँग्रेसच्या वतीने नुकतंच निवेदन देण्यात आलं..13 जूनला महावितरण ला निवेदन दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर..
निवेदनाची कुठल्याही स्वरूपात दखल घेऊ नये असा प्रकार सध्या वितरण विभागात घडल्याचा पाहायला मिळतंय..शिंदखेडा काँग्रेसच्या वतीने पुन्हा महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपच्या सरकारमध्ये असताना ऊर्जामंत्री भाजपचे असून कारवाईला दिरंगाई का होते असा सवाल शिंदखेडा शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे..
सोमवार पर्यंत वीजपुरवठा शेतकऱ्यांना सुरळीत न झाल्यास ऊर्जा मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी करत मोर्चाद्वारे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा शहर काँग्रेसने दिलाय

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बळीराजा महावितरण आणि वीज मंडळाच्या कारभारावर संतप्त झालेला असून नाराजीचा सूर उमटलेला आहे
वीज विभागाचा भोंगळ कारभार समोर आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे..स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्याचे ऊर्जामंत्री या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कधी वठनिवर आणतील असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय
132 केवी चे सबस्टेशन स्थानिक आमदार या भागात उभारू शकले नाहीत त्यामुळे तालुक्यातील विजेचे नियोजन पूर्णतः कोलमडलं असल्याचं पाहायला मिळतंय
वीज लपंडावतात का सुरळीत न झाल्यास ऊर्जा मंत्र्यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी येत्या सोमवारी 26 जून रोजी मोर्चाचे आयोजन केले जाईल असा इशारा निवेदनातून महावितरण प्रशासनाला देण्यात आला आहेयावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, माझी पंचायत समिती सभापती सुरेश देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे, शहराध्यक्ष दिनेश माळी, कैलास वाघ आदी उपस्थित होते..
यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here