संपर्क प्रमूख चंद्रकांत रघुवंशींनी[Shivsena] कार्यकर्त्यांना बांधलं शिवबंधन..

0
226

नंदुरबार :२१/३/२३

शासनाच्या योजनांच्या लाभ गरजूंना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

शिवसैनिकांनी समाजाची सेवा करायची आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या शाखेचे कार्यकर्ते कार्य करीत असल्याच्या आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सर्व शिवसैनिकांना करावे. असे प्रतिपादन माजी आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे फलक अनावरण संपर्कप्रमुख रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

21323
01

कार्यक्रमाप्रसंगी खेडदिगर परिसरातील शेकडो युवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पेंढारकर यांनी प्रास्ताविक केले.

व्यासपीठावर नंदुरबार नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी नगरसेवक परवेज खान, माजी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील,जिल्हाउपप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर,जिल्हाउपप्रमुख भानुदास पाटील, शहादा शहर प्रमुख रोहन माळी, तालुकाप्रमुख राजू पाटील,शहादा तालुका उपप्रमख आत्माराम नगराळे,युवासेना शहरप्रमुख सागर चौधरी,जिल्हा उपसंघटक पुष्पेन्द्र चौधरी,सामाजिक कार्यकर्ते नितिन चौधरी आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिडीया प्रभारी गौरव हजारे,युवासेना संघटक योगेश चौधरी,शाखाप्रमुख संतोष चित्ते,उपशाखाप्रमुख इंद्र मुसळदे,शाखा सचिव किशोर चौधरी, शाखा सदस्य राधे सिरसाठ, श्रीनाथ शिरसाठ,गोपल ईशी, साकीर तेली,राहुल शिरसाठ,वासुदेव मुसळदे, विरेंद्र शेमळे,कोमल चौखर, जयदेव मुसळदे,दत्तराज मुसळदे,श्रीनाथ पवार, गोपिचंद पवार, पंडीत मुसळदे, रोहिदास मुसळदे, सखाराम तावडे यांनी प्रयत्न केले.

समाजाची सेवा हेच शिवसेनेचे ध्येय

बोर्ड लावणे, लेटर पॅड छापणे हे शिवसेनेचं ध्येय नसून,समाजाची सेवा करणे हेच शिवसेनेचे ध्येय आहे. जो गरजू असेल त्याला मदत करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महिलांच्या सन्मानार्थ एसटी बस भाड्यात पन्नास टक्के सूट दिलेली आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनांचे प्रकरण तयार करून योजनेच्या कार्यकर्त्यांनी लाभ द्यावा असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here