मिरज : मिरजेत घराचा ताबा सोडण्यासाठी कुपवाड रस्त्यावर व्यवसायाने वकील असलेल्या महिलेचे घर पेटविण्यात आले आहे . याप्रकरणी तिघांविरुद्ध गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ॲड. प्रवीणा हेटकाळे यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ॲड.प्रवीणा हेटकाळे या मेनायतील सॅम्युअल नायनन यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांच्यात राहते घरखरेदीचा करार झाला होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सोनी सॅम नायनन याने घर रिकामे करण्यासाठी हेटकाळे यांच्याकडे तगादा लावला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
त्यानंतर सांगलीतील एका पतसंस्थेचे अध्यक्ष अजित जेठानंद अडवाणी यांनी ‘तुम्ही राहत असलेल्या घरावर कर्ज आहे, ते घराचा लिलाव करायचा आहे, तुम्ही राहत असल्याने घराला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे घर रिकामे करा, नाहीतर दीड कोटी रुपयांना घर खरेदी करा’ असे धमकावले. त्यामुळे अडवाणी यांच्याविरुद्ध हेटकाळे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
या रागातून सोनी नायनन, अजित अडवाणी व हाशिम मणेर या तिघांनी घराचा कब्जा घेण्यासाठी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य पेटविण्यात आले. गॅस सिलिंडर, शेगडी व बोअरची मोटर असे १५ हजाराचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी फिर्यादीत दिली आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सारिका गायकवाड,एम.डी.टी.व्ही. न्युज कोल्हापूर