शहादा /नंदुरबार -४/६/२३
उपप्रादेशिक परिवहन विभागात शहादा न्यायालयाच्या निकालाने खळबळ उडाली आहे.
जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.सी.एस.दातीर शहादा यांनी तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे व वेलजी नहाडिया मावशी सहाय्यक रोकपाल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नंदुरबार यांना २ वर्षाची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की ,वरील नमूद दोन्ही आलोसे हे दिनांक २४/०२/२०१२ रोजी गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे कर्तव्यावर होते.
यावेळी मूळ तक्रारदार कंटेनर/ ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते.
दिनांक २४/०२/२०१२ रोजी मूळ तक्रारदार हे गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे आले असता वरील नमूद आलोसे यांनी मूळ तक्रारदार कंटेनर /ट्रक चालक यांच्याकडून त्यांची गाडी गव्हाली चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४,०००/- रुपये लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी केली
, ४,०००/- रुपये लाच पंचां समक्ष स्वीकारली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ३००३/२०१२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२,१३(१)(ई)(ड),१३(२) अन्वये गुन्हा दाखल होता.
नमूद गुन्हयाच्या तपासाअंती मा. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शहादा यांच्या न्यायालयात स्पेशल केस क्रमांक १२/२०१४ अन्वये खटल्याचे कामकाज चालले
सदर गुन्ह्याचा तपास ए.जी.वडनेरे, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक,लाप्रवि नंदुरबार यांनी करुन झोडगे व मावची यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. यात परिस्थितीजन्य साक्षीपुरावे पाहून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
यात सरकारतर्फे श्री.स्वर्नसिंग गिरासे यांनी काम पाहिले.
नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी