तळोदा :- हुंडा कमी दिला म्हणून किंवा मुलगी पसंत नाही अशा काही कारणांनी लग्न न जुळण्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, मुलीच्या वडिलांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे लग्न तुटल्याची घटना तळोदा तालुक्यातील एका गावात घडली आहे. तुमच्या नंदुरबार – तळोदा प्रवासात आमचा जीव निघायला करत होता… कारण खड्डे एवढे आहेत की, अक्षरशः आम्ही अंगदुखीच्या गोळ्या घेत आहोत… म्हणुन माफ करा, आपले नाते नाही जमू शकत, असे कारण वर पित्याने दिल्याने भावी वधू पित्याला मोठा धक्का बसला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ऐकुन नवल वाटेल अशी हि घटना आहे. एका मुलीच्या पित्याने (नाव जाहिर न करण्याच्या अटीवर) आपल्यावर बीतलेला प्रसंग एमडीटीव्ही सोबत शेयर केला. हे सर्व सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू ते लपवू शकले नाहीत. आपल्या भरलेल्या दोन्ही डोळ्यांवर हात फिरवत त्यांनी सांगितलेली घटना खरंच मन सुन्न करून गेली.
नंदुरबार – तळोदा रस्त्यावर हातोडा पूल झाल्यापासून दोन्ही शहरातील अंतर २० किलोमीटरने कमी होऊन १ तासाचा लागणारा वेळ अर्ध्या तासावर आला. सुखाचा रस्ता आतामात्र जीवघेणा ठरू पाहत आहे. गुजरात हद्दीतील तापी नदीवर रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महाराष्ट्रात लागणारी इतर जिल्ह्यासाठी बांधकामासाठी रेती ओव्हरलोड गाड्यांनी नंदुरबार ते तळोदा रस्त्यावरून वाहतूक होत आहे. यामुळे रस्ता दाबला जाऊन रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.
हे सुध्दा वाचा:
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS
जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
तळोदा ते नंदुरबार अर्धा तास आता दोन तासांवर वेळ लागायला आली आहे. जागोजागी खड्डे व या रस्त्यावर कायम रहदारी असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही वेळेस समोरासमोर रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या ठोकल्या जातात. किरकोळ अपघात तर रोजच होत असतात. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी अगदी गाडी पुढे जाणार की नाही हा प्रश्न पडतो. वाहनधारक प्रवासी या रस्त्यामुळे त्यांना मनस्ताप सोबत अंगदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार तसेच गाडीचे दुरुस्तीसाठी काम काम निघत आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दरम्यान, या रस्त्यामुळे एक वेगळीच घटना समोर आली आहे. तळोदा येथील एका पालकाने आपले नाव गुपित ठेवावे या अटीवर आपबीती सांगितली. मुलगी मोठ्या बहिणीच्या दीरच्या लग्नात पिंपळनेर येथे एप्रिल महिन्यात आमच्या सोबत आलेली होती. तेथे बरेच पाहुणे असल्याने त्यांनी मुलीचे पालक म्हणून माझ्याकडे मुलगी पाहण्याचे आमंत्रण दिले, ते आमंत्रण मी स्वीकारले. फोनवर बऱ्याच पैकी देवाण – घेवांणच्या गोष्टी झाल्या. जवळ जवळ ९०% फोनवरच जुळून आले होते. आम्ही वर मुलाचे घरदार पाहून आलो असल्याचे सोयरिक आम्हास पटले होते. आमचे ( मुलीचे ) घरदार पाहण्यासाठी आम्ही मुलाकडील मंडळींना आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे मे महिन्यात येण्याचे ठरले. पाहुणे आले… पाहुणचार वैगरे करुन गेलेत. दुसऱ्या दिवशी फोन आला आणि…. ऐकुन धक्काच बसला. तुमच्या नंदुरबार तळोदा प्रवासात आमचा जीव निघायला करत होता. कारण खड्डे एवढे आहेत की, अक्षरशः आम्ही अंगदुखीच्या गोळ्या घेत आहोत. म्हणुन माफ करा आपले नाते नाही जमू शकत. हे सांगताना अश्रू लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाच्या डोळ्याला आता धारी लागल्या होत्या.
हे सुध्दा वाचा:
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS
जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
तळोदा तालुका जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रांताधिकारी, उपअभियंता सार्वजानिक बांधकाम विभाग, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी राजपत्रित अधिकारी तळोदा कार्यालयांत असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची हालत खराब असली तरी याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अपघातांच्या मालिका सुरु आहेत. कोण जायबंदी तर कोण जिवाने जात आहे. मात्र, या बापावरील आघात हा निश्चित मन सुन्न करणारा आहे. आतातरी अधिकरी शासन दरबारी रस्त्याचा कायमचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, तळोदा ग्रामीण.