नाशिक /मुंबई -५/५/२३
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात गठीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली.
श्री संत सावळाराम महाराज स्मारक, तसेच भिवंडी-कल्याण-शीळफाटा रुंदीकरणातील बाधितांना मोबदला आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी सर्वेक्षण करा, गरज भासल्यास त्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
श्री संत सावळाराम यांच्या भव्य इमारत आणि स्मारकाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करुन हे स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणात काही गावांतील जमीनींचे भूसंपादन झाले,
पण त्यांचा मोबदला योग्यदराने गेला नाही.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि त्याबाबतचे धोरण आणि दर निश्चित करावे.
जेणेकरून या गावांना वारंवार मोबादल्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.
हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि.आर. श्रीनिवासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय संघर्ष समितीचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, महेश पाटील, गजानन मंगरूळकर आदींसह जयेश भाग्यवंत महाराज, आर्किटेक्ट राजीव तायशेटे आदी उपस्थित होते.
तेजस पुराणिक ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक/मुंबई ब्युरो