Delhi Gang War : गँगवॉरची तीव्रता वाढली, ‘भाई’ शब्दावरून दोन जण ठार

0
726
Delhi Gang War

दिल्लीतील (delhi) अशोक विहारमध्ये सोमवारी रात्री एका शब्दावरून दोन गटांमध्ये गँगवॉर सुरू झाला. या गँगवॉरमध्ये (gangwar) दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भलस्वा डेअरी परिसरात राहणारे रघू, झाकीर आणि भुरा हे सोमवारी रात्री अशोक नगर येथे डब्लू नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी डब्लूला फोन केला, पण तो फोन उचलला नाही. तेव्हा ते त्याच्या घरी गेले आणि त्याला शोधू लागले.

तेव्हा तेथील एका स्थानिक इसमाला विचारले की डब्लू कुठे राहतो? मात्र त्याने सरळ उत्तर दिले नाही. उलट ‘ डब्लू नाही, डब्लू भाई म्हणायचं’, असं त्यांनाच सुनावलं.

:हेही वाचा:

याच मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळाने डब्लू हा देखील तिथे आला. दोन्ही पक्षांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. त्याच दरम्यान, रघूने डब्लूला गोळी घातली. हे पाहून डब्लूच्या साथीदारांनी रघूला गोळ्या घातल्या. यात रघूचा जागीच मृत्यू झाला.

या गँगवॉरदरम्यान रघूचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. मात्र काही अंतरावर गेल्यावर रघूचा एक साथीदार भुरा पकडला गेला आणि डब्लूच्या साथीदारांनी त्याची हत्या केली. तर, घटनास्थळावरून पळून गेला रघूचा साथीदार झाकीर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेने अशोक विहार परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

:हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here