नंदुरबार -११/४/२३
तालुक्यातील विरपुरसह चिंचोरा येथे सोमवारी समाज कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांच्या हस्ते ३० कुटुंबांना केशरी रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित, खा.हिना गावित, डॉ. कांतीलाल टाटीया यांच्या मार्गदर्शनाने व तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने सदर गरजूंना रेशनकार्ड मिळाले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यामध्ये विनादे ठाकरे, फुलसिंग ठाकरे, मंगलसिंग ठाकरे, सुरेश ठाकरे, जालम चौधरी, ईश्वर ठाकरे, पिना ठाकरे, सुनिल ठाकरे, सुनिल चौधरी,भुन्या पवार, अशोक पवार, सागर पवार, रेवाजी ठाकरे, राकेश चौधरी, काशीनाथ चौधरी या गरजू कुटुंबांना रेशन कार्ड देण्यात आले. विशेषतः आता शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधांचा लाभ सदर लाभार्थ्यांना घेता येणार आहे.
एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार
निलेश अहेर..प्रतिनिधी