कृषी विभागामार्फत लोकसहभागातुन वनराई बंधारा बांधण्यात आला…!

0
303

मौजे-रानीपुर – एक दिवस माझ्या बळीराजासाठी या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातुन वनराई बंधारे बांधण्याचे काम चालु आहे. व

नराई बंधाऱ्यामुळे पाणी जमिनीत मुरते.आसपासच्या विहिरीचे व कुपनलिकेचे पाणीही वाढते तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.रब्बी पिकाला सिंचनासाठी संरक्षित पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.

download

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाईच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.वनराई बंधा-यामुळे पाणीटंचाईचे संकट किमान एक दोन महिने लांबविण्यासाठी साखळी पद्धतीने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधुन जल संधारणास सहाय्यभूत ठरेल.

गावातील पाळीव तसेच जंगलातील प्राण्यांन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.सदरील कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी,शहादा श्री. तानाजी खर्डे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी यांचे मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या वनराई बंधा-यासाठी गावातील प्रगतशील शेतकरी तसेच कृषी विभागाचे तळोदा मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी श्रीमती रजनी कोकणी,कृषी पर्यवेक्षक भरत माळी, संदीप दाणी कृषी सहाय्यक मदन कायत, नितीन कलाल, अक्षय नाईक, प्रतेश गांगुर्डे यांनी श्रमदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here