धडगाव : क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मृतीदिनानिमीत्त मनखेडी येथे गुणवंतांचा गौरव

0
564

धडगांव :- तालुक्यातील मनखेडी बुद्रुक येथे भगवान बिरसामुंडा स्मृतीदिनानिमीत्त विद्यार्थ्यांसाठी करीयर मार्गदशर्न व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्षातील १० वी १२ वी तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षैत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या व प्रशासकीय सेवेत नवनियुक्त तथा सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानखेडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून गटशिक्षण अधिकारी आर.डी.बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील तसेच मंडळ कृषि अधिकारी अनुप रासकर उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS

3a5e8fa3 2728 427d 948c 1c64cdde360e

या कार्यक्रमात दहावीतील ग्रामस्तरावरील प्रथम क्रमांक दिव्या भानुदास पावरा ( ८५.६०% ), द्वितीय क्रमांक पायल दारासिंग पावरा ( ८४.८०% ) व तृतीय क्रमांक सुशीला चीका पावरा ( ८४.४०% ) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्तरावरील बारावीतील प्रथम क्रमांक कुशाल जेठ्या पावरा ( ७४.७० %) द्वितीय क्रमांक सोनी रतीलाल पावरा ( ६९.८३%) तृतीय क्रमांक विद्या भानुदास पावरा ( ६७.८३% ) तसेच मनखेडी बु.गावातील क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय १०० मीटर सुवर्ण पदक विजेता धावपाटू अनिल नटवर पावरा व राज्यस्तरीय धावपटू कांस्य पदक विजेती पायल दारासिंग पावरा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS

bf32cc0f 2a8e 4489 b11f 63a511c27daa

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मनखेडी बु ग्रामपंचायतीतील हा उपक्रम नाविन्यपूर्ण असल्याचे आर.डी.बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील तसेच मंडळ कृषि अधिकारी अनुप रासकर यांनी सांगितले. ग्रापंचायतीचे व विधायक भारती, आहलाई बहुउद्देशिय संस्था यांचे विशेष कौतुक केले. मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले तसेच पालकांना आपल्या पाल्यांना विविध क्षेत्रात उंच भरारी घेण्यास प्रोत्साहन व पाठबळ देण्यास उस्फुर्त केले.

गोपाल पावरा. एमडीटीव्ही न्युज, धडगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here