धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक :लोकहिताय पॅनलची निर्विवाद आघाडी..

0
244

शिंदखेडा /धुळे -१७/६/२३

येथील साई लॉन्स मंगल कार्यालयात धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी च्या निवडणुक प्रचारार्थ लोकहिताय पॅनल ची बैठक मेळावा घेण्यात आला
लोकहिताय पॅनलचे गटनेते रविंद्र खैरनार व चेअरमन शिवानंद बैसाणे आणि पॅनल प्रमुख विनोद पाटील, बाबुराव वसावे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. हयावेळी ग स बँक चे माजी रिजनल चेअरमन नरेंद्र अहिरे , शोभा पवार शिक्षक नेते गिरीश बागुल , गिरीश परदेशी , बापू आखडमल , कैलास शिंदे , चंद्रकांत डिगराळे प्रमोद पवार इद्रिस जनाब विकास गवळे नरेंद्र पाटील हेमंत शेवाळे जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन व मार्गदर्शन शिक्षक नेते गिरीश बागुल यांनी केले
तर प्रास्ताविक उमेदवार रविंद्र बोरसे यांनी केलं

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पतपेढी च्या लोकहिताय पॅनलच्या अठरा उमेदवारांना निवडुन देण्यासाठी आवाहन केले.
फळा हे निवडणुक चिन्ह आहे.
तसेच गटनेते रविंद्र खैरनार यांनी लोकहिताय गटाने गेल्या अकरा वर्षात स्वच्छ व पारदर्शी प्रशासन देऊन खर्चात काटकसर करुन पतसंस्था वाचवली , वाढविली
तसेच नाविन्यपूर्ण बदल घडवून सभासदांची अस्मिता जोपासली व यापुढे ही अस्मिता जोपासली जाईल. म्हणून लोकहिताय पॅनलला विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
एकंदरीत धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या लोकहिताय पॅनलचे सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –


शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शिक्षक रविंद्र भटु बोरसे हया उमेदवाराची प्रचारात आघाडी घेतली आहे.
22 जुनला मतदान पतपेढी शाखेच्या प्रत्येक ठिकाणी होणार आहे
जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे आणि लोकहिताय पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here