धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत धुळे जिल्ह्यास एकूण १ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेत फळबाग लागवड व फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येणार आहे. अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती, निरधीसूचित जमाती, दारिद्य रेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेतंर्गत लाभार्थी, अनु जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषि कर्जमाफ्री योजना २००८ मधील पात्र लाभार्थीना लाभ देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मजूर कार्ड (जॉबकार्ड) आदि कागदपत्रे तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेल्या लाभार्थी यादीत नाव असणे व प्रपत्र अ व प्रपत्र ब (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेतंर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, संत्रा, जांभूळ, अंजीर, चिंच, आवळा, नारळ, बांबु, साग, बोर, सिताफळ, कागदी लिंबू, डाळींब, आवळा, सिताफळ, मोसंबी, शेवगा आदि फळपिके व गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा इत्यादी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो.
या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ) व संमती पत्र (प्रपत्र ब) ऑफलाईन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषि सहाय्यक/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावे. असे आवाहन श्री. तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
एमडीटीव्ही न्युज ब्युरो, धुळे, नंदुरबार