DHULE CRIME:पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त: दोंडाईचा पोलिसांची कारवाई..

0
305

धुळे -२२/७/२३

दोंडाईंचा,नंदुरबारकडून अंजनविहिरे मार्गे मालेगावकडे कारमधून अवैधरित्या होणारी गुटख्याची वाहतूक दोंडाईचा पोलिसांनी रोखली. चालकाला ताब्यात घेत १ लाख ७३ हजार ६८८ रुपयांचा गुटखा व १० लाखांची कार असा एकूण ११ लाख ७३ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच काल दि.१९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एमएच १९ बीएल ८००० क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून अवैधरित्य गुटखा वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अंजनविहिरे गावाजवळ दोंडाईचामार्गे मालेगावकडे जाणाऱ्या संशयीत कारला थांबविले. चालकाने त्याचे नाव अजगर अली नियाज अली ( वय ५५ रा.जाफर नगर,पार्ट किनारा, मालेगाव ) असे सांगितले.तसेच वाहनात काय आहे,अशी विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.संशय आल्याने पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात विमल पानमसाला व व्ही १ तंबाखू आढळून आली. १ लाख ७३ हजार ६८८ रुपयांचा गुटखा व १० लाखांची कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हा गुटखा कोणाकडे नेला जात होता.याचे मालक कोण याचा पोलीस तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंडयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .. अवैध धंद्यांबाबत माहिती द्यावी, कारवाई होईलच दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे खपवून घेतले जाणार नाही.असे काही आढळून आले तर त्याची गय केली जाणार नाही. कुठे अवैध धंदे सुरू असल्यास दोंडाईचा पोलिस ठाण्याच्या ०२५६६- २४४०२३ / ९८८१७४५१०१ या क्रमांकावर माहिती द्यावी. कारवाई केली जाईल. तसेच माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,असे आवाहन दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केले आहे.अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशानुसार पो.कॉ पुरुषोत्तम पवार,अनिल धनगर,लखन कापुरे,हर्षद बागुल,प्रशांत कुलकर्णी,ललित काळे आदींनी हि कामगिरी बजावली
MD TV न्यूज, धुळे तालुका प्रतिनिधी ,दिलीप साळुंखे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here