धुळे : शेतकऱ्यांनी कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
199

धुळे :- राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण या योजनांतून ट्रॅक्टर व अनुषंगीक औजारांसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि यांत्रिकीकरण योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या https://mahadbtmahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अर्ज केल्यानंतर ऑनलाईन लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती, महिला शेतकरी यांना १ लाख ते १ लाख २५ हजार तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ हजार आणि १ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.

धुळे जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमेअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत / बैलचलीत / स्वयंचलीत औजारे खरेदी करणेकरीता ऑनलाईन लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार १२३० लाभार्थ्यांना ८ कोटी ९८ लाख ८३ हजार इतके डिबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकाशी जोडलेले आधार क्रमांक तसेच शेतीचा ७/१२, खाते उतारा, राष्ट्रीयकृत बँकेत खाते इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे. शेतकऱ्याने ट्रॅक्टर याबाबीचा एकदा लाभ घेतल्यास पुढील १० वर्ष त्याबाबीकरीता अर्ज करता येणार नाही, मात्र इतर औजारांसाठी अर्ज करता येईल. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.तडवी यांनी कळविले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो धुळे – नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here