रजाळेच्या कन्येची गरुड भरारी !

0
512

निवेदिता राजपूत यांची पुणे येथे नामांकित कंपनीत मॅनेजरपदी नियुक्ती

नंदुरबार- तालुक्यातील रजाळेच्या रहिवासी असलेल्या तथा ह.मु.धुळे येथील सौ.निवेदिता निरंकरसिंह राजपूत यांनी गरुड भरारी घेतली असून त्यांची राज्यात नावाजलेल्या तसेच इतर देशातही नामांकित असलेल्या पुणे येथील किर्लोस्कर कंपनीमध्ये सिनियर मॅनेजरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

निवेदिता गिरासे यांनी लहानपणापासूनच मनात इच्छा होती की, एक दिवशी एका मोठ्या पदावर काम करावे, ती आज त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांनी रात्रं – दिवस अभ्यासाच्या परिश्रमामुळे आज मोठ यश मिळवून शिखर गाठलय. या यशामागे त्यांच्या वडिलांसह त्यांचे काका यांचे देखील मोठ योगदान लाभल आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

निवेदिता राजपूत यांच शिक्षण धुळे येथे पूर्ण झाले आहे. त्यांच्या या यशामागे पती निरंकरसिंह गिरासे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. निवेदिता राजपूत या दिलीपसिंग गिरासे यांची कन्या तर रजाळे येथील प्रगतीशील शेतकरी दरबारसिंग गिरासे यांची पुतणी, ग्रामसेवक योगेंद्र गिरासे यांची बहिण होत. रजाळेच्या कन्येने पुण्यासारख्या शहरात एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर निवड झाल्याबद्दल रजाळेसह परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here