Dhule.. शिक्षक भरतीत धनगर जमातीला २५०० पदे द्या ; शिक्षण सभापती यांना निवेदन

0
405

धुळे:- जुलै महिन्यात ५० हजार पदांची शिक्षक भरती होत आहे. धनगर जमातीच्या १२ हजार विद्यार्थ्यांनी अभियोग्यता परीक्षा शुल्क म्हणून एक कोटीपेक्षा जास्त रक्कम सरकारला दिली. गेल्या १२ वर्षात शिक्षक भरती नसतानाही व मागील अनुशेष शिल्लक असूनही बिंदू नामावली घोटाळ्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एनटीसी प्रवर्गाचे शिक्षक अतिरिक्त दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगून या भरतीत एनटीसी (NTC) प्रवर्गला अडीच हजार पदे मिळवून द्यावीत, अशी मागणी अभियोग्यता शिक्षक कृती समितीचे राज्य समन्वयक विलास पाटील यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती महावीरसिंह रावल यांच्याकडे केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

एनटीसी (NTC) प्रवर्गातील ज्या उमेदवारांची मेरिटनुसार खुल्या प्रवर्गामध्ये (OPEN) मध्ये निवड होते. त्या जागांची नोंद रोस्टर तपासणीत किंवा बदलीच्या वेळी खुल्या प्रवर्गामध्ये (OPEN) होण्याऐवजी एनटीसी (NTC) प्रवर्गामध्ये धरून रोस्टर तपासला जातो. त्यामुळे एनटीसी (NTC) प्रवर्गातील जागांचा अनुशेष रिक्त राहण्याऐवजी त्या जागा अतिरिक्त दाखवल्या जात आहेत.

त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासननुसार पहिल्या टप्प्यात ५० हजार पदे भरल्यास बिंदू नामावलीची सखोल तपासणी करून मागील शिल्लक पदांचा अनुशेष मिळून २५०० जागा एनटीसी प्रवर्गासाठी द्याव्यात, उर्दू माध्यमातील शाळेत एनटीसी प्रवर्गाचे शिक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तिथे खुल्या प्रवर्गातील मुस्लिम उमेदवार भरले जातात. त्याऐवजी मराठी व इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या इंग्लिश विषयाच्या अभियोग्यता धारकांना तेथे संधी देवून समजावरील अन्याय दूर करावा, गेल्या १२ वर्षापासून भरती बंद असताना गैरमार्गाने शिक्षक भरती केलेल्या संस्था चालकांची चौकशी करावी, TET परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना काढून त्यांच्या जागी अभियोग्यता धारकांना घ्यावे, एक शिक्षकी आणि रात्र शाळांवर सर्व भटक्या जमातीच्या बेरोजगार अभियोग्यता धारकांना संधी देवून समाजाला स्थैर्य द्यावे, निवृत्त शिक्षकांना घेवू नये,

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आदिवासी आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना अशी शासनाची भूमिका आहे. त्यानुसार आदिवासीप्रमाणेच पेसा क्षेत्राअंतर्गत नोकऱ्यातील राखीव आरक्षण धनगरांनाही द्यावे, गेल्या १० वर्षापूर्वीच सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरीपासून वंचित राहिलेल्या व वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सर्वात आधी प्राधान्य द्यावे, पवित्र पोर्टलमध्ये फक्त अनुदानित शाळांची नोंदणी करावी, आभियोग्यता धारकांना विनाअनुदानित किंवा अंशत अनुदानित शाळांवर पाठवू नये, समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी संस्थांच्या सर्व शाळांची नोंद पवित्र पोर्टल वर करून ३० जुलै पर्यंत ५५ हजार पदांची शिक्षक भरती एकाच टप्प्यात करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

वरील मागण्या मान्य न झाल्यास व वयाची पस्तीशी गाठलेल्या पात्र उमेदवारांना नोकरीपासून वंचित रहावे लागल्यास भरतीवर स्टे आणण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागू, तसेच राज्यव्यापी आंदोलन करून येत्या निवडणुकीत आमच्या मागण्या पूर्ण करणाऱ्यांनाच निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

✍🏻 दिलीप साळुंखे. एमडी.टीव्ही. न्यूज धुळे ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here