धुळे:
सलाम मुंबई फाउंडेशन, मुंबई व राष्ट्रसंत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्य आदर्श शिक्षक एन.पी.भिलाणे यांनी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन संदर्भातील निवेदन दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले. याप्रसंगी न.पा.चे आरोग्य विभाग प्रमुख श्री.महाजन व संतोष माणिक यांनी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन न.पा.च्या गाड्यांवर ध्वनी क्षेपकाद्वारे दोंडाईचा शहरातील नागरिकांना तंबाखू मुक्तीचे आवाहन करून जनजागृती करीत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रण करण्यासाठी. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही. ही जागतिक आरोग्य संघटनेने निवडलेली थीम आहे. याप्रसंगी ही मोहीम २५ मे ते ३१ मे २०२३ दरम्यान राबवताना तिच्या यशस्वीतेसाठी व आरोग्य संपन्न बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या विभागामार्फत विशेष योगदान व सहकार्य करू, असे आश्वासन संतोष माणिक यांनी दिले. याप्रसंगी न.पा.चे आरोग्य विभागाचे समन्वय रविभाऊ, श्री.शर्मा व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तंबाखू सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगामध्ये भारत देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत. तंबाखू ही इतर सर्व रोगांची जननी आहे. आज संपूर्ण भारत देशात २८.६% प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तींचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६% आहे.
मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१% युवक हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानाने हवा प्रदूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते या सर्व बाबी लक्षात घेऊनच सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून २००७-२००८ पासुन तंबाखू मुक्त शाळा अभियान सुरू करण्यात आलेले आहे. सलाम मुंबई फाउंडेशन गत अनेक वर्षांपासून तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवित आहे. हे अभियान महाराष्ट्र राज्य सोबतच इतर दहा राज्यांमध्ये देखील सुरू झालेले आहे. अशी माहिती राज्य आदर्श शिक्षक एन.पी. भिलाणे यांनी दिली.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्यूज धुळे.