Dhule News : शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी; कापसाच्या दरात झाली मोठी घसरण..!

0
114
dhule-news-a-big-fall-in-the-price-of-cotton

Dhule News – कापसाचे दर 7 हजार रुपयांच्या आत,शेतकऱ्यांना मोठा फटका.साक्री तालुक्यातील म्हसदीसह व परिसरातील शेतकऱ्यांचे यंदा कापसाच्या

उत्पादनात घट आलेली आहे. दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अवकाळी पावसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली, दर सहा हजार नऊशे रुपयांवर आले आहेत.

यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा झाला. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता. कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी आल्याने शेतकरी मेटाकुटीस आले. कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. राहिलेली कसर वादळी पावसाने भरून काढली. त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला १२ हजार रुपये

प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यंदा खासगी बाजाराचा प्रारंभ झाला, तेव्हा दहा हजार रुपये दर देण्यात आला. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, दरवाढीची शक्यता आता धूसर झाली आहे. कापसाच्या दरात घसरण झाली असून, दर सहा हजार नऊशे रुपयांवर स्थिरावले आहेत. एका मागून एक संकट येत असल्याने यंदाचा हंगामही हातून गेल्यातच जमा आहे. कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. अतिवृष्टीनंतरवादळी पावसाने अडचण झाली. उत्पादन घटले असून, सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आत आले आहेत. हा भाव पाहता लावगड खर्चही निघणे कठीण झाले आहे. ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच शेतीमालाचे भाव घसरले

गतवर्षी कापसाला नऊ हजारापर्यंत भाव मिळत होता. यावेळी ६ हजार ९०० भाव मिळत आहे. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी आनंदी राहिला पाहिजे, असे सर्वजण म्हणत आहेत. पण भाव द्यायची वेळ आली की कोणीही पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत शेतीमाल कुठे नेऊन ठेवला? असा प्रश्न शेतकर्यामध्ये उपस्थित होत आहे.तसेच गत काही वर्षांपासून सातत्याने नापिकीचा सामना करावा लागत आहे.

यंदा उसनवारी करून कापसाची लागवड केली. मात्र योग्य भाव काही मिळत नाही. मागणी करूनही शासन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देत नाही.

आनंदा नेरे, शेतकरी

खासगी व्यापारी गावोगावी कापूस खरेदीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडून गावोगावी भंम्रती केली जात आहे. शासकीय भावापेक्षा अधिक भावाने कापूस खरेदीसाठी या व्यापार्याकडून प्राधान्य दिले जात आहे .शेतकरी रोखीनेच कापसाची विक्री करीत असल्याचे चित्र बहुतांश म्हसदी परिसरात आहे.गतवर्षी शेतकऱ्यांना कापूस उत्पन्नही मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या मालाला मागणी देखील चांगली होती.

परराज्यांमध्ये कापसाच्या गाठींना चांगली मागणी होती. परंतु यावर्षी उत्पादन घटल्यामुळे उत्पादन मागणी कमी झाली आणि भाव सुद्धा कमी झाले. त्यामुळे उत्पादन घटले आहे. शेतकरी हैराण झाले आहेत.तसेच म्हसदी येथील व्यापारी दीपक शैषमल जैन यांनी म्हटले आहे. 

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here