Dhule News : नंदाणे चकाकले हायमस्टच्या प्रकाशात… ग्रामपंचायत निधीतून सोलर पथदिवे

0
351

धुळे: तालुक्यातील नंदाणे गावात सरपंच रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वात विकास कामांना गती मिळाली आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन मंजूर केल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यातच अनेक कामे करण्यात आली असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदाने गावात गेल्या पंधरवाड्यात गावात विविध ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत. गावातील आदिवासी वस्ती, दलीत वस्ती, भक्तिज्ञान आश्रमासहितच चौकाचौकात व ज्याठिकाणी अंधाराने नागरीकांना रात्रीच्यावेळी समस्या येत असत अशा एकुण ११ ठिकाणी जिल्हा वार्षिक नियोजन सन २०२२-२३ अंतर्गत अपारंपारीक उर्जा स्त्रोत विकास योजनेतुन सोलार हायमास्ट लाईट बसविण्यात आले. सदरील कामासाठी ९.९९ लक्ष रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या संकल्पनेतून व सायने गावाचे सरपंच तथा कृउबा उपसभापती योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांना गती देण्यात आली. गावातील अंधार दूर करण्यासोबतच सर्वसमावेशक विकासाच धोरण आखतांनाच सर्व समुदायांना व सर्व घटकांना एकत्रित प्रकाशमय करण्याचे काम सरपंच रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात गावात विकासकामे सुरु आहेत.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

गावातील ११ हायमास्ट सोबतच ग्रामपंचायत निधीतुन अनेक नवीन पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) बसविण्यात आले. तसेच जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती पावसाळ्याआधीच करण्यात आली आहे. या सोलार लाईट्समुळे ग्रामपंचायतीचे वीज बील कमी होणार असुन त्यासोबतच ग्रामस्थांकडून कर स्वरुपात येणाऱ्या निधीची बचत होईल व तो निधी इतर जनसुविधांसाठी खर्च करण्यात येईल. यावेळी लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, माजी सरपंच, सेवा सोसायटी माजी चेअरमन, संचालक, सर्व सहकारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

✍🏻 दिलीप साळुंखे. एमडी.टीव्ही न्युज, धुळे ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here