Dhule News : निपुण भारत अंतर्गत माता पालक गट मिळावा उत्साहात संपन्न

0
433

Dhule News – धुळे नेर येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.तसेच

माननीय श्री शुभम गुप्ता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या प्रेरणेने तसेच माननीय श्री राकेश साळुंखे साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे, माननीय श्री पवार साहेब गटविकास अधिकारी धुळे, माननीय श्रीमती सुरेखा देवरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे माननीय श्री संजीव विभाग साहेब शिक्षण विस्तार अधिकारी नेर यांच्या मार्गर्शनाखाली व श्रीमती अपर्णा जोशी मॅडम केंद्रप्रमुख नेर यांच्या प्रमुख उपस्थितीत नेर येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.

download

श्रीमती अपर्णा जोशी केंद्रप्रमुख नेर यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक मेळावा सायंकाळी ५ ते ७ वाजे दरम्यान घेण्यात आला. यावेळी माता पालक संघाच्या अध्यक्ष सौ सोनल भदाणे उपाध्यक्ष मनीषा सोनवणे सोनवणे माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य श्री सौ सुमनताई भिल हे देखील उपस्थित होते.हा मेळावा मुद्दाम सायंकाळी घेण्यात आला जेणेकरून सर्व महिला पालक उपस्थित राहू शकतील.तसेच

मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN हे एक मॅट्रिक आहे जे सरकारला सूचित करते  की मुलाने साक्षरता आणि संख्या शास्त्रातील किती मूलभूत कौशल्य प्राप्त केली आहेत. तसेच इयत्ता तिसरी मधील कौशल्य प्राप्त केल्यानंतर ते विद्यार्थी स्वयं अध्ययन करण्यास सक्षम होऊन पुढील वर्गात त्यांना कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक अडथळा येत नाही.याविषयी मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

आपल्या मुलांना शाळेत नियमित पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे आमचे कर्तव्य आहे.स्थलांतर होणाऱ्या पालकांना देखील पुन्हा विनंती करण्यात आली की आपल्या पाल्यांना सोबत गेहून जाऊ नका त्या ऐवजी गावातीलच नातेवाईकांकडे ठेऊन जा असे यावेळी श्री योगेश कोळी यांनी सांगितले.

मुलींच्या शिक्षणाबद्दल श्रीमती निर्मला गढरी यांनी सर्व माता पालकांना आवाहन केले की आपल्या सोबत लहान मुला मुलींना कामाला घेऊन जाऊ नका.मुलींच्या आरोग्याबाबत काळजी घ्या.स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी बाणवा.एक मुलगी शिकली तर ती तिच्या दोन्ही कुटुंबांना साक्षर करू शकते.

अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख श्रीमती अपर्णा जोशी यांनी सांगितले की येथील शिक्षक तन मन धनाने काम करीत आहेत.पूर्ण वेळ शाळेस देत आहेत.तुम्ही देखील त्यांना योग्य असा प्रतिसाद द्या.शाळेतील उपक्रंमात सहभाग घ्या.माता पालक गटातील पालकांनी आपल्या मुलांचा घरी अभ्यास करून घ्यावा.उपस्थित पालकांना व त्यांच्या प्रतिक्रिया पाहून मॅडम भारावून गेल्या.तसेच जे असाक्षर आहेत त्यांनी येणाऱ्या काही दिवसात नवभारत साक्षरता कार्यक्रम मध्ये भाग घ्या असे देखील आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस श्रीमती निर्मला गढरी, श्री अनिल साळुंखे व श्री जगदीश बोरसे यांनी गरबा नृत्याचे आयोजन केले होते त्याचा सर्व माता पालकांनी व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी व आदरणीय केंद्रप्रमुख श्रीमती जोशी मॅडम यांनी देखील मनसोक्त आनंद घेतला.मुलींची उपस्थिती वाढावी व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सदर पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शालेय परिसरातील सर्व पालकांचे सहकार्य लाभले.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here