Dhule News Today – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Shrikant Dhivare) यांनी निष्कळजीपणा करणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडविले आहे.
केंद्रीय आपत्कालीन सेवेला संथ प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कंट्रोलला जमा करण्यात आले आहे. यामध्ये धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.केंद्राने डायल ११२ ही आपत्कालीन सेवा कार्यान्वित केली आहे. तिथे तक्रारदार किंवा संकटग्रस्त व्यक्तीने कॉल केल्यानंतर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आदींना मदतीसाठी धावून जावे लागते.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यांना ११२ वरील तक्रारीस प्रतिसाद देण्यासाठी एक ठराविक वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. तितक्या वेळात तक्रारदारांपर्यंत पोलिसांना पोहचावे लागते. शिवाय, तशी माहिती वरील यंत्रणेकडे सुपूर्द करावी लागते. परंतु, जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांकडून ११२ सेवेला नीट प्रतिसाद दिला जात नसल्याचे एसपी श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आले. (Dhule News Today)
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करातीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
हे देखील वाचा:
जानेवारी महिन्याच्या डायल ११२ च्या रिपोर्टनुसार धुळे जिल्हा हा सर्वात शेवटच्या नंबरवर असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना ही कारवाई करावी लागली. कहर म्हणजे आजही धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना वायरलेसवर ऑनलाईन येण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणखी संतप्त झाले. आज वायरलेसवरच संदेश फिरवत त्यांनी वरील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत कंट्रोलला हजर होण्याबाबत सांगितले. (Dhule News Today)
तर याच प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर आजच निघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पदभार सोडून जावे लागणार पोलीस कंट्रोलला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंच्या आदेशामुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, निजामपूर सहा. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना आपला पदभार सोडून पोलीस कंट्रोलला जावे लागणार आहे. तर प्रभारी ठाण्यांचा चार्ज दुय्यम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचेही पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहे.दरम्यान, श्रीकांत धिवरेंनी आज खेळलेल्या मास्टर स्ट्रोकमुळे पोलीस दलात पुन्हा मोठा भूकंप झाला असून आणखी काही बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अवैध धंदे खपवून घेणार नाही.
पोलीस अधिक्षक धिवरे
पोलीस अधिक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या धडाकेबाज कामगिरीने पोलीस विभागात खळबळ उडाली असल्यांचे दिसून येत आहे पोलीस अधिक्षक श्रीकांतजी धिवरे साहेब यांनी पदभार स्विकारला तेव्हापासून नेत्रदिपक कार्यवाही करत आहेत त्यातच अवैध धंद्याबाबत सुध्दा जबरदस्त कार्यवाही करत आहेत ज्या पोलीस विभागाच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास तेथील जबाबदार पोलीस अधिकारीवर निलंबनाची कार्यवाही केली जाणार असल्याची ताकीद सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकांतजी धिवरे साहेब यांनी दिली आहे.
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?

