Dhule : धुळे जिल्ह्यातील नेर येथे संभाव्य स्थलांतराची शक्यता…

0
421
Dhule

Dhule: धुळे तालुक्यातील नेर येथील संभाव्य स्थलांतरित होणाऱ्या पालकांची जि.प.शाळा महादेव वस्ती रात्रीची सभा उत्साहात संपन्न झाली तसेच माननीय श्री शुभम गुप्ता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या प्रेरणेने व माननीय श्री राकेश साळुंखे साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे, श्रीमती ताईसाहेब सुरेखा देवरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे,माननीय श्री संजीव विभांडीक साहेब शिक्षण विस्तार अधिकारी नेर,श्रीमती अपर्णा जोशी मॅडम केंद्रप्रमुख नेर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर येथे रात्री ठीक आठ वाजता संभाव्य स्थलांतरित होणाऱ्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती.अध्यक्षस्थानी श्री जीवनदादा भील उपसरपंच नेर,श्री दयाराम दादा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य नेर,श्रीमती सुमनताई भील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या तसेच शिक्षण प्रेमी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत अनेक शैक्षणिक विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.स्थलांतरित कष्टकरी ऊसतोड,वीट भट्ट्या,बांधकाम,दगडांच्या खाणी,शेती,कृषी,उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार रोजगारासाठी राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात तसेच गुजरात राज्यात सर्वाधिक स्थलांतरित होत आहे.स्थलांतर करणारे बहुतेक मजूर हे आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील आहे. कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेपोटी त्यांना स्थलांतर करणे गरजेचे असते.

प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीनंतर ऊस तोडणी कामगार स्थलांतरित होत असतात परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असल्याने लवकर स्थलांतर होत आहेत. या स्थलांतरित काळामध्ये कुटुंबासमवेत लहान मुलेही स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मुलांचे संरक्षण, आरोग्य व शिक्षण यांची प्रचंड हेळसांड होते.अशा स्थलांतरित कुटुंबातील मुलं गावातच राहतील शाळेत जातील आणि शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील यासाठी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मदतीने संभाव्य स्थलांतरित होणाऱ्या पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी आधीच स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाचा शोध घेतला. त्यांच्या मुलांची माहिती घेतली. त्यांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात आले.

Dhule

या सभेमध्ये सर्व पालकांना विनंती करण्यात आली की आपली मुले सोबत घेऊन न जाता तिथेच आपल्या नातेवाईकांकडे ठेवून जावेत जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल.तसेच पालकांना जून महिन्यामध्येच हंगामी वस्तीगृहाची देखील माहिती देण्यात आली व आपली मुले येथेच ठेवून जावे अशी विनंती करण्यात आली.

ज्या पालकांना येथे ठेवून जाणे शक्यच नसेल त्यांना शिक्षण हमी कार्ड बद्दल माहिती देण्यात आली व असे सांगण्यात आले की सोबत जाताना हे कार्ड तुमच्या जवळील शाळेत दाखवावे व तेथून परत इकडे येताना सोबत घेऊन यावे जेणेकरून मुलांचे शिक्षण खंडित होणार नाही.

मागील वर्षी देखील शाळेतील सर्व शिक्षक स्थलांतरित बालकांना भेटी देण्यासाठी व त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेले होते.तेथील त्यांचे जीवन किती कष्टमय होते हे प्रत्यक्ष अनुभवले.ऊन,वारा,पाऊस,निर्जन वस्ती अशा कठीण परिस्थितीत मुले राहत होते.आपली परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या मुलांना शिक्षण देणे किती गरजेचे आहे याचे देखील त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अनेक विद्यार्थी लाभाच्या योजना यांबद्दल देखील मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.

तसेच या बैठकीसाठी शाळेतील शिक्षक श्री रामभाऊ पाटील,श्री योगेश कोळी,श्रीमती निर्मला गढरी,श्री अनिल साळुंखे,श्री जगदीश बोरसे यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ पालक श्री हिरामण मोरे,श्री श्रावण सोनवणे,श्री नाना भील,श्री शिवाजी पाटील,श्री तुळशीराम साळवे,श्री काळू अहिरे,श्री विजय गायकवाड,श्री रामदास सोनवणे,श्री मनोज पवार,श्री दिलीप अहिरे आजी-माजी विद्यार्थी शालेय समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here