धुळे -२३/७/२३
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील साईभक्त मित्र मंडळाच्या वतीने म्हसदी ते शिर्डी पायी दिंडीला साई मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला.
काल ढोल ताशाच्या व टाळ मृदृंगाच्या गजरात गावातील साईं बाबांच्या पालखीची दिंडी काढण्यात आली. यावेळी साईबाबांच्या पालखीचे असंख्य भाविकांनी औक्षण करीत दर्शन घेतले. यावेळी साईबाबांचा गजर करीत पायी दिंडी ककाणी, भडगाव (मा) मार्गाने शिर्डीकडे रवाना झाली.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
येथील ग्रामपुरोहित तथा साईभक्त गणू महाराज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीत मोठ्या प्रमाणावर साईभक्त सहभागी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गणू महाराज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन जाते . त्यामुळे या मार्गावरील गावागावात दिंडीचे स्वागत होत आहे. या दिंडीत ५० हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. काल या दिंडीचे ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दिंडीचे आगमन होताच मुख्याध्यापक भटू वाणी यांनी साई भक्तांचे स्वागत केले. तर दिंडीचे मार्गदर्शक गणू महाराज दीक्षित यांचे विद्यालयाच्या वतीने साने गुरुजी शैक्षणिक संस्थेचे संचालक एन.डी.शिंदे व रवींद्र बेडसे यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षक जी.एम. मारणर,प्रसाद बेडसे,सुषमा अहिरे,बापू गायकवाड,दयाराम पवार,कुणाल बेडसे,ह.भ.प नानाजी मोहिते,सोनू बेडसे,पुंजाराम बेडसे,सागर बेडसे,भटू बेडसे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे..