नंदुरबार : गाडीचे कागदपत्र दाखवून देखील विनाकारण त्रास देत पैशांची मागणी करणाऱ्या धुळे येथील वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने २०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध धुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील तक्रारदार हे नेहमी दुचाकीने धुळे येथे ये – जा करीत असतात. धुळे शहरात प्रवास करताना त्यांना तहसील चौकात तसेच अँग्लो उर्दू हायस्कुल जवळ ड्युटीवर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी उमेश दिनकर सूर्यवंशी हे नेहमी कागदपत्रांची मागणी करीत असत. पैसे न दिल्यास ऑनलाईन मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्याची धमकी देत तक्रारदार यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असताना देखील हवालदार सूर्यवंशी हे २०० ते ५०० रुपयांची मागणी करीत असतात.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत तक्रारदार यांनी दिनांक २ मे रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली होती. दिनांक ३ रोजी जुना आग्रा रस्त्यावरील अँग्लो उर्दू शाळेजवळ पथकाने सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून ऑनलाईन दंडाची धमकी देत उमेश सूर्यवंशी २०० रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून सदर २०० रुपयांची लाच घेताना पथकाने हवालदार सूर्यवंशी यांना रंगेहात पकडले. त्याविरोधात धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सण. १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदरनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोनि. प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, भूषण सलानेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो धुळे, नंदुरबार.