आमदार जयकुमार रावलांच्या मागणीला यश..
शिंदखेडा /धुळे -१६/७/२३
पशुधन आजारी पडल्यावर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागत असे. परंतु आता फिरत्या पशु वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आली असुन यामुळे थेट शेतकऱ्यांच्या पशुधनापर्यत सेवा पोहचणार आहे. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी सततचा पाठपुरावा केला होता. अखेर हया मागणीला यश आले आहे.राज्यात पशुधनाच्या कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण , शस्ञक्रिया, वंध्यत्व , गर्भधारणा आणि आजारपण आदी प्रकारच्या पशु आरोग्य सेवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात पुरवल्या जातात. परंतु त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात पशुधन घेऊन जावे लागत होते.
हे हि वाचा :
नेर जि प शाळा : विद्यार्थ्यांनी अनुभवलं चांद्रयान 3 प्रक्षेपण
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
पशुधन चालल्यास सक्षम नसेल तर गाडी करून घेऊन जावे लागते. मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त योजनेद्वारे फिरत्या पशुचिकित्सा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर पहिल्या टप्प्यात 80 फिरत्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हयासाठी 1962 हा फ्री टोल कॉल करुन संपर्क केल्यावर फिरते पथक आपल्या दारी येणार आहे. एक लक्ष पशुधनामागे एक फिरत्या पथक नेमण्यात आले असुन एक चार चाकी वाहन, पशुवैदयक , आवश्यक यंत्र सामुग्री सह सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
”काही महिन्यापासून मी हया फिरत्या पथकाची मागणीसाठी प्रयत्नशील होतो. आज ही मागणीला यश मिळाले म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांचे आभार. हे शासन जनतेच्या हिताचे असुन खरोखर फिरत्या पथकामुळे ‘शासन आपल्या दारी ‘येणार आहे.”
-जयकुमार रावल ,माजी मंत्री तथा आमदार शिंदखेडा विधानसभा..
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज धुळे …