वाडे येथून महाशिवरात्रीनिमित्त निघाली दिंडी…

0
169

भडगाव,जळगाव :१६/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 वाडे ते काटेल धाम निघाली पायी दिंडी
2 कोठली येथे संपन्न झाला महाप्रसादाचा कार्यक्रम
3 महिला भाविकांची उपस्थिती होती दर्शनीय

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त वाडे ते काटेल धाम अशी पायी दिंडी मिरवणूक निघाली.

हि पहा सविस्तर बातमीhttps://youtu.be/N1m0belZjis

वाडेगावातून निघालेल्या पालखी मिरवणुकीत टाळ आणि मृदुंगांचा गजर करण्यात आला. ठिकठिकाणी महिलांसह भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. गोंडगाव कनाशी भडगाव कुठली पाचोरा मार्गे काटेलधाम देवस्थानावर दिनांक 18 रोजी ही दिंडी पोहोचेल.

कुठली गावात दिंडीचा आगमन होताच भाविकांनी दिंडीचं स्वागत केलं. विनायक पाटील यांच्या घरी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. पत्रकार अशोक परदेशी यांनी कुठली येथे संत गुलाब बाबा यांच्या पालखीचे दर्शन घेतलं. या दिंडीत एकूण 45 नागरिक महिला भाविक सहभागी झाले आहेत.

कौतिक महाराज यांच्या प्रेरणेने या दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली. या दिंडीत भगवंताचे नामस्मरण करीत भक्तीचा सुगंध दरवळताना पहावयास मिळाला.

सतीश पाटील एमडी टीव्ही न्यूज भडगाव तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here