शिरपूर :१२/३/२०२३
नुकताच शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्प 2023 24 सादर केला .
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला हेतू पुरस्सर डावल्याचं अखिल भारतीय तांडा सुधार समितीने गंभीर आरोप केलेत..
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने आर्थिक उत्थानासाठी विकास महामंडळ उभं झालं
खरं मात्र त्या महामंडळाला घोर उदासीनता विद्यमान सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पातून अधोरेखित झाली.. महामंडळाच्या वाटेला निराशेच्या अक्षता वाटल्या..
असा गंभीर आरोप अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी म्हटले..
मागील महिन्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी येथे जाऊन मोठमोठी भाषणे दिली
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हाके वरून दहा लाख लोक पोहरादेवी येथे दाखल झाले
यावेळी राठोड यांनी समाजाला भावनिक आवाहन करीत शासनाकडे 28 मागण्यांचे निवेदन सादर केलं..
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बंजारा भाषेत मदाहू नये अधिक गोड बोलत महाराष्ट्राच्या तिजोरीची एक चावी संजय राठोड यांच्याकडे देऊ अशी घोषणा केली
परंतु तिजोरी तर सोडा पण एकही पैसा या समाजाच्या वाट्याला आला नसल्याने भटक्या आणि विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकार घालत आहे असा आरोप त्यांनी केला..
नामा बंजारा यांनी एम.डी.टी.व्ही न्यूज प्रतिनिधी यांच्याशी या संदर्भात संवाद साधला..
आणि आपली खरमरीत प्रतिक्रिया देत राज्य सरकारला टीकेचं लक्ष केलं..
राज जाधव,शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज