जिल्हा भोईसमाज जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न..

0
194

नंदुरबार -२५/५/२३

दि. २३ मे २०२३ वार मंगळवार रोजी ठिक २.०० वा. भोईराज भुवन, भोई गल्ली नंदुरबार येथे जिल्हा भोईसमाज जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न झाली
लक्ष्मण काशिराम वाडीले अध्यक्ष नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संस्था यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली ..
भिमा भोई यांचे प्रतिमा पूजन करण्यात आलं
महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला मेळावा आयोजित करणे या विषयावर यथायोग्य चर्चा करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष श्री.लक्ष्मण वाडीले यांनी महिला,नारी शक्ती समाज परिवर्तन घडवू शकते, कुटुंबा बरोबर समाज घडवू शकते हे पटवून दिले.
नंदुरबार जिल्हा भोईसमाज सेवा संस्था व नंदुरबार तालुका भोईसमाज यांच्या संयुक्त विद्यमाने
नंदुरबार येथे ऑगस्ट महिन्यात महिला,युवती मेळावा व गुणवंत विद्यार्थीनी सत्कार सोहळा आयोजित होणार असल्याचे सांगितलं
जिल्हा युवा अध्यक्ष श्री.चंद्रकांत भोई यांनी युवा कार्यकारिणी जाहीर केली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यात दिपक शिवदे कार्याध्यक्ष, दिपक साटोटे संघटक, अविनाश बेंद्रे कोषाध्यक्ष, प्रमोद मोरे सचिव, जयेश मोरे उपाध्यक्ष, दिनेश साटोटे उपाध्यक्ष, दिनेश ढोले उपाध्यक्ष, संजय साठे उपाध्यक्ष, दिपक भोई उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली
यावेळी नवनिर्वाचित युवा कार्यकारणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला
बैठकीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील महिला एकत्रीकरणा वर भर देण्यात येऊन लवकरच महिला जिल्हा कार्यकारणी गठीत करणे तसेच समाजातील शासकीय/निमशासकीय तसेच निवृत्त कर्मचारी यांची जिल्हा समिती स्थापन करण्यात येणार असं ठरवण्यात आलं
बैठकीस जिल्हा अध्यक्ष .लक्ष्मण वाडीले, कार्याध्यक्ष . राजू तावडे सर,जिल्हा संघटक रामकृष्ण मोरे,कोषाध्यक्ष .विनोद वानखेडे,सह कोषाध्यक्ष .पंडित धनराळे जिल्हा उपाध्यक्ष .सोनवणे रावसाहेब, .प्रकाश वानखेडे .रविंद्र ढोले युवा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत भोई ,विवाह समिती अध्यक्ष महेन्द्र साठे, माजी सचिव मोहन मोरे नंदुरबार तालुका अध्यक्ष पंकज शिवदे,जिल्हा कायदे विषयक सल्लागार श्री प्रकाश वानखेडे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रवदन मोरे यांनी केले
शेवटी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भगवान ढोले यांनी प.पुज्य. श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे वाटप केले.व राष्ट्रगीताने बैठक संपन्न झाली.
निलेश गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here