जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण: तळोद्यात ‘उष्णतेची लाट’ विषयक प्रशिक्षण आणि जनजागृती संपन्न

0
123

तळोदा /नंदुरबार -२२/४/२३

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), मंत्रालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), जिल्हा नंदुरबार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आपत्ती पूर्व तयारी, क्षमता वर्धन व प्रशिक्षण, DRR (Disaster risk reduction) अंतर्गत जिल्ह्यामध्ये “उष्णतेची लाट (कारणे, परिणाम व उपाय)” या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा, महात्मा फुले एम.एस.डब्लू आणि मातोश्री झवेरीबेन मोतीलाल तुरखिया बी.एस.डब्लू महाविद्यालय तळोदा ‍जि. नंदुरबार येथे दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.

नंदुरबार जिल्ह्याचा अतितीव्र उष्मलाट प्रवण जिल्हांमध्ये समावेश होतो आहे. मागील काही वर्षा पासुन नंदुरबार जिल्ह्यात मार्च ते मे कालावधीत 40 अंश सेल्सीयस पेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

उष्णतेची लाट कारणे, परिणाम व उपाय या बाबात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असुन त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नागरीकांमध्ये, शाळा, महाविद्यायलातील विद्यार्थ्यामध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), जिल्हा नंदुरबार यांच्या व्दारे महाविद्यायलयाच्या समन्वयाने प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत उष्णतेची लाट त्यांची कारणे, परिणाम व उपाय या विषयी वर श्री सुनिल शंकर गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, NDMA प्रकल्प यांनी सहभागी सर्व समाजकार्याचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन / माहीती दिली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उषा वसावे, प्रा. निलेश गायकवाड, प्रा. डॉ. प्रमोद जाधव, प्रा.नितीन तायडे, प्रा. रामचंद्र परदेशी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here