नंदुरबार -१३/४/२३
अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी लेखन करणाऱ्या समतेच्या वाटेवरील प्रतिभावंत कवी व लेखकांनी न घाबरता मनातील भावना व्यक्त केल्या.समतेच्या वाटेवरील आपल्या कवितेचा आवाज बुलंद असावा.
समाज व देशहितासाठीच आपली साहित्य निर्मिती व्हावी, असे मत आदिवासी दलीत-साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.
फुले-आंबेडकर स्टडी सर्कल शहादा यांच्या वतीने आयोजित बहुभाषिक कवी संमेलन व व्याख्यान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्थळी बुधवारी सायंकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, रंजना कान्हेरे, तुषार उगले, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वनिता पटले,सौ.लता कुवर,सौ.रेश्मा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.सोनवणे म्हणाले, शाळेत न जाताही मनातील विचार प्रकट करणे हेही साहित्यच आहे.
जीवनाच्या विद्यापीठातील अनुभवाचे शिक्षण नाकारता येणारे नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा’ यातील ‘शिका’ म्हणजे शाळेत जाऊन अभ्यास करणं एवढेच अभिप्रेत नाही.
समाजातील व्यवस्थेचा अभ्यास करून योग्य निर्णय घेणे होय.त्यांनी ‘मा’ही कविता सादर केली.
बोदवड (जळगाव) येथील तुषार उगले यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेबांचे योगदान याविषयी विस्तृत माहिती दिली.
यावेळी कवी अरूण जोहरी, विनायक सावळे, अजबसिंग गिरासे, प्रदीप पाटील, भीमसिंग पवार,भूषण गवळे, किरण मोहिते, दादाभाई पिंपळे, नरेंद्र महिरे, संजय निकुंबे,डॉ.सत्यसागर अवचार, रतिलाल सामुद्रे, प्रदीप केदारे, सुभाष नाईक आदिंनी विविध भाषांमध्ये कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चुनिलाल ब्राह्मणे यांनी केले.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि https://bit.ly/3UoK7E0जॉईनकरा.
प्रास्ताविक सुनील पाटोळे यांनी केले.स्वागत व आभार फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे संस्थापक अनिल कुवर यांनी मानले.
यावेळी पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर,बापू घोडराज, शांतीलाल कुवर, प्रमोद बैसाणे,अॅड.आनंदा निकम, डॉ.अभिषेक पेंढारकर, सुनील शिरसाट, प्रितम निकम,जितेंद्र कुवर, राहुल बैसाणे, सुरेश बिराडे, धनराज ईशी,शांतीलाल अहिरे, सिद्धार्थ बैसाणे,प्रा.राजेंद्र निकुंबे,किसन बिरारे, दिलीप बिरारे, संतोष कुवर, संघरत्न कुवर, संजय कुवर, रवींद्र आगळे, प्रशांत जोंधळे, सतीश निकम, अविनाश निकुंबे आदींची उपस्थिती होती.
संजय मोहिते ,प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज शहादा