रामदूत भक्त परिवारातर्फे आज दुधाळे आणि नंदुरबारात सुंदरकांड..

नंदुरबार -५/४/२३

चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील श्री रामदूत हनुमान भक्त परिवारातर्फे दुधाळे येथील पहाडी हनुमान आणि विमल विहार कॉलनीतील दत्त मंदिरात सुंदरकांड महाकथेचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार शहराच्या उत्तरेस असलेल्या कोकणहिल वसाहतीच्या पुढील दुधाळे शिवारातील पहाडी हनुमान मंदिरात आज गुरुवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत सुंदरकांड कथेचे पठण होणार आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हनुमान चालीसा आणि महारतीनंतर दुपारी बारा वाजेला महाप्रसादाचे वितरण होईल.

त्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान कोरीट नाक्याजवळील विमल विहार कॉलनीतील श्री गुरुदत्त मंदिरात सुंदरकांड कथेचे वाचन होईल.त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल.भाविकांनी सुंदरकांड कथा, हनुमान चालीसा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री रामदूत सुंदरकांड भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज. जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here