तळोद्यात सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रबोधन अभ्यास वर्ग संपन्न

0
303

तळोदा /नंदुरबार -२८/५/२३

सत्यशोधक समाज संघटनेच्या वतीने शहरातील न्यू हायस्कूल मध्ये ‘सत्यशोधक समाज व भारतीय मूळ कृषी सांस्कृती’ या विषयावर प्रबोधन सत्र घेण्यात आले.
सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं
या प्रबोधन सत्राचे उद्घाटन वरिष्ठ महाविद्यालय, तळोदाचे प्रा. जयपाल शिंदे यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश बुधावलचे सरपंच मंगलसिंग पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निमेश सूर्यवंशी,अध्यापक शिक्षण मंडळचे कार्यकारीणी सदस्य अजित टवाळे, तळोदा तैलिक समाजाचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, भोई समाजाचे अध्यक्ष संतोष वानखेडे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तळोदा शाखा उपाध्यक्ष तारा मराठे,आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या उदबोधन सत्रला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र सत्यशोधक समाज संघ मुख्य संयोजक सत्यशोधक वैद्य सुरेश झाल्टे यांनी संबोधित केले.
या उद्बोधन सत्रात त्यांनी भारत देशाच्या कृषी संस्कृतीची व या संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या गणमाता, कुळदेवी,सम्राट बळीराजा, खंडोबा, महासुभा (म्हसोबा ), भैरोबा,जोतीबा, प्रल्हाद, विरोचन, हिरण्यकश्यपू ई. महानायक व महानयिका यांची सांगड घालत माहिती दिली
संत कबीर, संत तुकोबाराय, शिवराय यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
सोबतच महात्मा जोतीराव फुले ,पुढे राजर्षी शाहू व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची समाजात रुजवणूक होण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विशद केली.
संत,समाजसुधारक यांच्या संदर्भातली सांस्कृतिक माहिती दिली.
या उद्बोधन सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात प्रा.जे एन शिंदे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी महापुरुषांचे विचार आवश्यक असून त्यातून समाजाला प्रेरणा मिळत असते.
या उद्बोधन यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे विश्वस्त डॉ डी बी शेंडे,एन के माळी,मुकेश कापुरे, संतोष केदार,सुनील पिंपळे, संदीप मुके,एन के माळी,अमोल पाटोळे,आदींनी परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here