अ.भा. मराठी नाट्य परिषद अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड .. उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचे केले ट्विट ..

मुंबई -१७/५/२३

प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली.

ADVERTISEMENT

तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली

तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

SPONSORED CONTENT

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली.

त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहपदी अजित भुरे यांची निवड झाली असून सहकार्यवाहपदी समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली आहे.

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाने दणदणीत विजय मिळवला होता,

त्याशिवाय कार्यकारी समिती सदस्यांमध्येही ‘रंगकर्मी नाटक समुहातील’ ११ जणांची निवड झाली आहे.

यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.

”अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून माझे मित्र श्री प्रशांत दामले यांची निवड झाली, त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन!
कलावंताच्या भूमिकेतून त्यांनी रंगभूमीची सेवा केलीच, आता नेतृत्त्वाच्या भूमिकेतून सुद्धा त्यांच्या हातून रंगभूमीची सेवा घडावी, यासाठी माझ्या त्यांना अनेकानेक शुभेच्छा ! त्यांच्या कारकिर्दीत मराठी रंगभूमी अधिक बहरेल, यात शंका नाही. निवडून आलेल्या संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन !”

अशा आशयाचं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ..

जाणून घेऊ नाट्य क्षेत्रातील हे अवलिया आहेत तरी कोण :
प्रशांत पुरुषोत्तम दामले हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.
मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. ‘टूरटूर’ या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली.
या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला.
यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला.
यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.
प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत.

प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (६ नोव्हेंबर २०२२) एकूण १२,५०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६ वा होता.

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.
हि नाटके आहेत पुढीलप्रमाणे :
*आम्ही दोघं राजा राणी
*एका लग्नाची गोष्ट
*ओळखना पाळख
*कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री तेजश्री प्रधान)
*गेला माधव कुणीकडे (>१७४६ प्रयोग)
*चल काही तरीच काय
*चार दिवस प्रेमाचे (>१०२६ प्रयोग)
*जादू तेरी नजर
*टुरटूर
*नकळत दिसले सारे
*पाहुणा
*प्रियतमा
*प्रीतिसंगम
*बहुरूपी
*ब्रह्मचारी
*बे दुणे पाच
*माझिया भाऊजींना रीत कळेना
*मोरूची मावशी
*लग्नाची बेडी
*लेकुरे उदंड झाली
*व्यक्ती आणि वल्ली
*शूsss कुठं बोलायचं नाही
*श्री तशी सौ
*संशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे)
*साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री शुभांगी गोखले)
*सासू माझी ढासू
*सुंदर मी होणार
*एका लग्नाची पुढची गोष्ट
*सारखं काहीतरी होतय ..
या नाटकातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्यात ..
पुण्यात प्रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची एक प्रशिक्षण संस्था आहे.
प्रशांत दामलेंच्या पुढील वाटचालीस एम डी टी व्ही च्या हार्दिक शुभेच्छा ..
ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here