अध्यक्षपदी माजी सैनिक भूषण पवार यांची बिनविरोध निवड..

शिंदखेडा : २३/३/२३

येथे मराठा समाज मंगल कार्यालय या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन समाजातील होतकरू मुलांच्या हस्ते करून मराठा समाज नवयुवक मंडळाची स्थापना करण्यात आली.

ADVERTISEMENT

प्रसंगी माजी ग्रा प सदस्य गणेश दगा मराठे, मधुकर किसन पवार, संचालक यादव प्रेमराज मराठे, आप्पासो रावण मराठे, भास्कर मराठे,युवराज मराठे,विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवयुवक मंडळाची कार्यकारणी पदांची घोषणा भरत नामदेव मराठे यांनी केली.

SPONSORED CONTENT

अध्यक्षपदी (माजी सैनिक) भूषण अभिमन्यू पवार तर उपाध्यक्षपदी प्रवीण सुनील मराठे यांची निवड करण्यात आली

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच भरत नामदेव मराठे सचिव , प्रशांत जगदीश मराठे खजिनदार, भूषण दिलीप मराठे कार्याध्यक्ष, गणेश किसन मराठे उपकार्याध्यक्ष, महेंद्र अरुण मराठे सहसचिव,ऋषिकेश पांडुरंग मराठे सहखजिनदार, यादव प्रेम राज मराठे सल्लागार,नंदलाल नामदेव मराठे सल्लागार,चेतन मधुकर पवार सहसल्लागार,दिनेश बापू मराठे सहसल्लागार ,योगेश गणेश मराठे सोशल मीडिया प्रमुख ,कैलास नारायण मराठे सदस्य ,प्रशांत भास्कर मराठे सदस्य, यश मुकेश मराठे सदस्य ,उमेश सुधाकर मराठे सदस्य ,पंकज भास्कर मराठे सदस्य यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.

प्रसंगी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भूषण पवार यांनी मनोगतातून म्हणाले की समाजातील सर्व तरुण पिढीने माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या पदाची जबाबदारी यावर खरा उतरून दाखवेल,

समाजातील तरुण पिढीस चांगल्या कामास प्रवृत्त करून योग्य दिशा दाखवण्याचे काम करत राहील,

पुढे म्हणाले की समाजातील तरुण वर्गाने चांगलं व वाईट यातील फरक ओळखावा, तरुणांनो तुम्ही संघटित व्हा व समाजापुढे आदर्श निर्माण करा.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मराठे तर आभार भूषण पवार यांनी केले .

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही. न्यूज..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here