मुंबई -१५/४/२३
आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा आज म्हणजे 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे.. 15 जून पासून चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून 27 लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार ..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० महिन्यांत घेतलेले निर्णय आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ जनतेला मिळावेत, यासाठी शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा आज, शनिवारपासून सुरू होत आहे.
‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ असे अभियान असून, त्याचे नियोजन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर जनकल्याण कक्षही स्थापन करण्यात येणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र, यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयांत जाऊन जमा करणे, कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियांतून जावे लागते.
दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते.
कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये खेटे घालावे लागतात.
अनेकांना योजनांची माहितीच नसते आणि त्यामुळे त्याचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही.
यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण आदी ठिकाणी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ हा अभिनव आणि पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत..
एम.डी. टी.व्ही. न्यूज ब्युरो मुंबई