तळोदा : २७/२/२३
केळींना चांगला भाव असल्याकारणाने तळोदा तालुक्यातील रांजणी प्रतापूर चिनोदा सह परिसरात केळी कापणी एक महिनाभरापासून जोरात सुरुवात करण्यात आली आहे.
चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावलाय.
या हंगामात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळी लागवड करण्यात येते.
केळी हमखास उत्पन्न देणारे पीक असल्याचे सांगण्यात येतं. केळी या पिकाला चांगला हवामान लाभलं असल्याने केळी पिकाची उत्तम प्रकारे वाढवून केळीचे गड ही चांगली बनल्याने चांगला भाव मिळत असल्याचा सांगण्यात येत असून व्यापाऱ्यांकडून चढा ओढीने भाव देण्यात येतोय.
शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा या पिकामुळे होतोय.
शेतकऱ्यांकडून बाहेरून खोड आणला जातोय.
ठिबक टाकून सरीवर लागवड करण्यात येते. त्यांना पुरेसं आवश्यक पाणी देण्यात येतंय.
रांजणी येथील योगेश भोसले शेतकऱ्याने 21 वर्षांपासून या हंगामात केळी लागवड केली असून हमखास उत्पन्न मिळते. उन्हाळ्यात फारसा केळी पिकाला पाण्याचा ताण जाणवणार नसल्याने पीक उत्तम प्रकारे येईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज


