भडगाव /जळगांव -४/६/२३
भडगाव तालुक्यातील वाडे येथील केळी उत्पादक शेतकरी इश्वर महादु माळी यांनी तिखीबर्डी वस्ती जवळील शिवारात त्यांचे शेतात ६ हजार केळीच्या खोडाची लागवड केलेली होती.
केळी बागा उत्कृष्ट प्रतिचा हिरवळीने बहरलेला आहे.
केळीचे घड निसवडीला मोठया प्रमाणात सुरु आहेत.
माञ या केळीत एका केळीच्या घडाला अर्ध्यापासुन दोन वेगवेगळया दिशेला दोन केळीचे घड लागलेले आहेत.
गिरणा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केले जाते
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र अशा प्रकारे अद्याप तरी कुठेही पाहायला मिळाला नाही
विशेष म्हणजे या घडाला चक्क दोन केळीचे कंबळ फुललेले आहेत.
निसर्गाच्या या चमत्कारामुळे शेतकरी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेतकरी कुतुहलाने या केळीबागेत हा प्रकार पाहायला जात आहेत.
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज


