नंदुरबार : २३/३/२३
राज्यातील अनेक बाजार समितीचा कारभार प्रशासक चालवत होते.. त्यामुळे प्रशासक राज होते
शासनाने विशेषतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित केलाय…
27 मार्चपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे तसेच 27 तारखेपासून 3 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिनांक असेल..
मिळालेल्या नामनिर्देशन पत्रांच्या यादीच्या प्रसिद्धीचा दिनांक शेवटच्या दिनांक पर्यंत जसजशी मिळतील त्याप्रमाणे करण्यात येईल…
5 एप्रिल 2023 हा नामनिर्देशन पत्रांच्या छाननीचा दिनांक असेल.. 6 एप्रिल हा दिवस छाननी नंतर वैध नामनिर्देशक पत्रांच्या यादीच्या प्रसिद्धीचा असेल…
ज्या दिनांकापर्यंत उमेदवारी मागे घेता येईल तो दिनांक 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 यादरम्यान असणार..
21 एप्रिल 2023 रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल तर निशाण्याचा वाटप देखील तेव्हाच उमेदवारांना करण्यात येईल…
28 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार.. तर मतदान दिनांकापासून तीन दिवसाच्या आत मतमोजणी होणार..
मतमोजणी झाल्यानंतर लगेचच समितीचा निकाल जाहीर होणार..
ही संपूर्ण माहिती प्रसिद्धीस माहितीसाठी सचिव डॉक्टर पी एल खंडागळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळवले आहे…
या बातमीसाठी नारायण ढोडरे, नंदुरबार तालुका ग्रामीण प्रतिनिधी सह ब्युरो रिपोर्ट एम.डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार