शेतकऱ्यांनो … कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करा

0
200

धुळे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांचे आवाहन

onian 6025885 m

धुळे : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च, 2023 कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल रुपये 350/- व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अनुदान मागणी अर्ज स्विकारण्यासाठी 20 एप्रिल, 2023 पर्यंत मुदत दिली आहे. ज्या शेतक-यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेडकडे लेट खरीप लाल कांदा विक्री केलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणी अर्ज 20 एप्रिल, 2023 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


कांदा अनुदान मागणी अर्ज (कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेडकडे व तालुका उप/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये विनामुल्य मिळेल), विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (खाते क्रमांक व IFSC Code सह), आधारकार्डची झेरॉक्स प्रत, सहमती असणारे शपथपत्र. टिप- ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियाच्या नावे आहे व ७/१२ उतऱ्यावर पिक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीचे शपथ पत्र अर्जासोबत जोडावे. याबाबत ७/१२ उतारा ज्यांचे नावे असेल त्यांच्या बॅक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल. असेही जिल्हा उपनिबंधक श्री. चौधरी यांनी कळविले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here