साक्री :१९/३/२३
गेल्या दहा दिवसांपासून तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने पुन्हा साखरी तालुक्यातील ग्रामीण पट्ट्यात हजेरी लावली..
सीमा वरती भागात असलेल्या गावांमध्ये गारपिटीसह अवकाळी न अक्षरशः थैमान घातलं..
महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दमदार पावसाना हजेरी लावत पिकांचे अतोनात नुकसान केलं..
शेतकऱ्यांच्या काढणीचा वेळ आता असताना त्यांच्या हातात तोंडातला घास हिरावून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडला…
रब्बी हंगामातील प्रमुख पिकांमध्ये कांदा ,गहू, हरभरा ,टरबूज या पिकांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाल्याची माहिती समोर येते..
ठिकठिकाणी शेतात मध्ये गारांचा खच सचल्याची दृश्य पहावयास मिळतय .. छडवेल कोरडे परिसरात मोठ्या स्वरूपात गारांचा पाऊस झाला..
त्यामुळे या भागातील बळीराजाची शेती पूर्णतः उध्वस्त झाली…
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नुकताच माजी खासदार बापू चौरे ,अतुल सोनवणे ,किशोर वाघ ,हिंमत साबळे ,प्रकाश पाटील ,ज्ञानेश्वर पगारे, तुषार गवळी ,महेश वाघ, पंजाब गांगुर्डे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांची चर्चा केली…
शेतकऱ्यांना दिलासा दिला…
शासन दरबारी नुकसान भरपाई मागण्याची आपण विनंती करणार असल्याचे देखील या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सांगितलंय..
त्यामुळे शेतकऱ्यांना वरचा मुलामा का होईना पण काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हे तेवढेच खरं…
जितेंद्र जगदाळे, साक्री तालुका प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज, साक्री