महिला दिनी काढली महिला पोलिसांनी रॅली ..

0
206

नंदुरबार :८/३/२०२३

मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमंलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता.

ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला.

सदर मोटार सायकल रॅलीला सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व डॉ. तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांनी हिरवा झेंडा दाखविला.

832023 2
01

मोटार सायकल रॅली समोर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले.

सदरची रॅली ही पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथुन निघून नवापुर चौफुली, साक्री नाका, सोनार खुंट, हाट दरवाजा, सिंधी कॉलनी, C.B. पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा, नेहरु पुतळा, नगर पालिका, आंधारे चौक, धुळे चौफुली, नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले.

पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे सदर रॅलीचा समारोप झाला.

महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांनी बाल विवाह प्रतिबंधक उपक्रमाचे फलक हाती घेवून जनजागृती केली.

सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार ह्या हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here