शिंदखेडा:१७/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 शिंदखेडा नगरपंचायत समोर केलं वंचित बहुजन आघाडीने साखळी उपोषण..
2 युवा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी केलं नेतृत्व
3 संबंधित ठेकेदार व शाखा अभियंतावर कारवाई करण्याची केली मागणी
4 आंबेडकर समाज मंगल कार्यालयाचे काम केले निकृष्ट दर्जाचं
शिंदखेडा शहरात शिंदखेडा नगरपंचायत अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंगल कार्यालय आहे. मात्र ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलय.
या समाज मंगल कार्यालयाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने केलीये. संबंधित ठेकेदार आणि शाखा अभियंता त्यांच्या संगनमतातून हा प्रताप करण्यात आला आहे. केवळ पैसे लाटण्याचाच हा प्रकार उघड झालाय.
कार्यालयाचे सुशोभीकरण तर दूरच हे कार्यालय समस्यांच्या विळख्यात सापडले. संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरपंचायत समोर साखळी उपोषण करून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलीये. युवक जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.
उपोषणाचा आज पहिला दिवस होता. मागण्या मान्य न झाल्यास उपोषण कायम राहील असा इशाराच या उपोषणकर्त्यांनी दिलाय. त्वरित डॉक्टर आंबेडकर समाज मंगल कार्यालयाजवळ सुशोभीकरण करण्यात यावं ही प्रमुख मागणी केली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष दीपक देसले, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, शहराध्यक्ष इकबाल तेली, यांच्यासह कार्यकर्ते राहुल पाटोळे, संदीप पाटोळे ,राहुल देवरे ,सोनू पाटोळे, विकी खाटीक आदी उपस्थित होते.
त्यामुळे या साखळी उपोषणाला प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल आणि महामानवाच्या नावानं तयार केलेल्या समाज मंगल कार्यालयाचं काम उत्तम दर्जाचे होईल आणि समाजोपयोगी उपक्रमांना लवकर खुलं होईल ही आशा करूया..
यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज..