अखेर … दोन महिन्यांपासून बंद असलेली बस झाली सुरु !

0
662

धुळे :- धुळे तालुक्यातील खंडलाय ते धुळे हि बस दोन महिन्यापासून बंद करण्यात आली होती. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर हि बस आजपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच भडगाव येथे देखील रात्री मुक्कामाला बस येऊन सादर बस सकाळी खंडलायमार्गे धुळे येथे जाणार आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक, भाजी,दूध विक्रेते यांची मोठी सोया झाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

खंडलाय परिसरातील बहुसंख्य नागरिक, भाजीपाला विक्रेते, दुध व्यवसायिक व शालेय विद्यार्थ्यांचे नियमित कुसुंबा व धुळे जाणे सुरू असते. मात्र या मार्गावर बस नसल्याने गैरसोय होत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बस सुरु करावी यासाठी धुळे येथील आगार प्रमुख पंकज देवरे यांना खंडलाय गावातील सामजिक कार्यकर्ते राहुल भदाणे यांनी समक्ष भेटुन सांगितले.

SPONSORED CONTENT

भडगाव बस ही खंडलाय मार्गे सुरु करावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यातुन मार्ग काढुन भडगावहून खंडलाय मार्गे धुळे सकाळी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला यश मिळाले व आज १९ रोजी बससेवा सुरु करण्यात आली. यामुळे खंडलायसह परिसरातील विद्यार्थ्यांकडून, नागरीक, ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here