दोन जण गंभीर जखमी : जखमींना नंदुरबार जिल्हारुग्णालयात हलविले
मुख्यमंत्र्यानी केली मृतांच्या कुटुंबियांना ३ लाखाची मदत जाहीर
नंदुरबार / धुळे :- साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावापासून काही अंतरावर असलेल्या वासखेडी – चिपलीपाडा दरम्यान एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून चौघान्चा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये चार महिलांचा सामावेश असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यानी प्रत्येकी मृतांच्या कुटुंबियांना ३ लाकांची मदत जाहीर केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
निजामपूर पासून चार ते पाच किमी. अंतरावर वासखेडी – चिपलीपाडा दरम्यान हा कारखाना आहे. वाढदिवस व विविध कार्यक्रमानिमित्त वापरले जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनविण्यात येत होती. यादरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या कारख्यात आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
अचानक लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५), राजश्री भैया भागवत (वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत याचा सामावेश असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल असून जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास पोलीस घेत आहेत. दरम्यान घटनास्थळी महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो साक्री / नंदुरबार