नंदुरबार :- शहरातील जळका बाजार परिसरातील चौधरी गल्लीत आज सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत सोने, रोकड, संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य असा लाखोंचा ऐवज जळून खाक झाला. गल्लीतील तरुणांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. यामुळे आग विझविण्यात यश आले. दरम्यान, या आगीत सर्वच जळून खाक झाल्याने चौधरी कुटुंब रस्त्यावर आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरातील जुन्या डी.डी.सी. बँकेच्या मागील भागात चौधरी गल्लीत वरच्या मजल्यावरील घरात रोहित संजय चौधरी हे आपल्या आईसह राहतात. आज सकाळी रोहित चौधरी हे कामानिमित्त बाहेर गेले तर त्यांची आई खाली येऊन शेजाऱ्याकडे गप्पा मारत बसल्या होत्या. सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काहींच्या लक्षात आले.
मात्र, या ठिकाणी आग पसरली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. सद्याचे तापमान व घर वरच्या मजल्यावर असल्याने आग पसरली. गल्लीतील तरुणांसह नागरिकांनी धाव घेत नजीकच्या घरातून पाणी आणून आग विझविण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. हे घर अडचणीच्या ठिकाणी असल्याने तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साकडा जिना, आगीचे लोट यामुळे आग आटोक्यात आणने जिकरीचे ठरत होते. मोठ्या शर्थीनंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या घटनेत रोहित चौधरी यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. तर आगीत १० तोळे सोने, तीन लाख रुपयांची रोकड, फ्रिज ,कुलर, टीव्ही यासह संसारोपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती रोहित संजय चौधरी यांनी दिली. त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रोहित चौधरी व त्यांच्या आईने केली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, नंदुरबार